महत्त्वाचेशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागीय समन्वय समितीवर सौ. वनिता बनकर यांची निवड


बारामती | संपादक-(विकी आगम)

बारामती : बारामतीच्या सामाजिक क्षेत्रातील सक्रिय नेतृत्वाला आणखी एक मोठा सन्मान मिळाला आहे. भारतातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागीय समन्वय समितीवर बारामतीच्या सौ. वनिता रवींद्र बनकर यांची निवड करण्यात आली आहे.

थोर समाजसुधारक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एक महत्वपूर्ण संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या महत्वाच्या समितीवर सौ. बनकर यांची झालेली निवड ही त्यांच्या सामाजिक कार्याची, नेतृत्वगुणांची आणि समाजाशी असलेल्या बांधिलकीची दखल मानली जात आहे. सौ. वनिता बनकर यांनी बारामती नगरपरिषदेच्या नगरसेविका म्हणून काम पाहिले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध सामाजिक, जनजागृतीपर आणि समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांमधील त्यांचा सहभाग लक्षात घेता, त्यांच्यावर रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागीय समन्वय समितीची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीमुळे बारामतीच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरातून सौ. वनिता बनकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *