महाराष्ट्रशहरसामाजिक

संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी; नाभिक समाजातील मान्यवरांचा सन्मान


बारामती/संपादक-(विकी आगम)

बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने संतश्रेष्ठ श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी श्री संत सेना महाराज मंदिर, भाई कोतवाल हाउसिंग सोसायटी, शिवनगर, भिगवण रोड, बारामती येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव होते. यावेळी माजी नगरसेवक दीपक साहेब मलगुंडे, भाई कोतवाल हाउसिंग सोसायटीचे विद्यमान चेअरमन रवींद्र सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवाध्यक्ष अभिजीत घाडगे यांनीही कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर भजन व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व बारामती तालुका नाभिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल दामोदर दळवी, पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन महेश वारुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष नवनाथ आपुणे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पतसंस्थेचे माजी चेअरमन व बारामती तालुका नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष महेंद्र यादव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

बारामती तालुका नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष हेमंत जाधव तसेच श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक सुधाकर माने यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. संघटनेचे आतापर्यंत झालेले सर्व माजी अध्यक्ष यांचा समाजासाठीच्या योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

समाजासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मोलाचे योगदान देणारे कै. बाबुराव साळुंखे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

पुण्यतिथीनिमित्त समाजबांधवांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नाभिक समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष रोहन शिंदे, सचिव आदेश आपुणे, उपाध्यक्ष अजित महाराज यादव, कार्याध्यक्ष अनंत नारायण आपुणे, खजिनदार शिरीष यादव, सहसचिव ओंकार शिंदे, विभागीय अध्यक्ष भरत महाले, भैय्या साळुंखे, सुरज वारुळे, अमोल सूर्यवंशी, संतोष काशीद, संतोष पवार, मारुती दुधाळ, प्रकाश जाधव यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *