सामाजिक

रेणुका नगर रहिवासी संघाच्या पाठपुराव्याला यश; महावितरणकडून मेन केबलचे काम पूर्ण


बारामती संपादक -(विकी आगम)

रेणुका नगर परिसरात मेन केबलची आवश्यकता असल्याने रेणुका नगर रहिवासी संघाच्या वतीने महावितरणकडे मागणी करण्यात आली होती. नागरिकांच्या या प्रश्नासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर महावितरणकडून रेणुका नगरमध्ये मेन केबल टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

या कामासाठी संस्थापक अध्यक्ष योगेश महाडिक, असलम भाई तांबोळी, बाबूलाल शेख आणि विशाल जाधव यांनी महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या कामासाठी सहकार्य करणारे महावितरणचे कर्मचारी अमोल गावडे यांचे रेणुका नगर रहिवासी संघाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार रेणुका नगर रहिवासी संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघाचा हा पाठपुरावा पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *