क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

सायबर फसवणुकीचे 3 प्रकार उघड; बारामतीत 2.68 कोटींचा फटका


बारामती (संपादक-विकी आगम )
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत सायबर फसवणुकीच्या तीन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या असून, या प्रकरणांत एकूण ₹2,68,12,000/- इतक्या रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तिन्ही प्रकरणांत गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे. पहिल्या घटनेत 74 वर्षीय महिलेची “डिजिटल अरेस्ट”चा बनाव करून फसवणूक करण्यात आली. WhatsApp व्हिडिओ कॉलद्वारे स्वतःला पोलीस अधिकारी सांगणाऱ्या व्यक्तीने अटक वॉरंटची भीती दाखवून महिलेकडून Fixed Deposit तोडून विविध खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करून घेतले. या प्रकारात ₹45,60,000/- इतकी रक्कम फसवण्यात आली. दुसऱ्या घटनेत एका नागरिकाला “Stock Market Experts” या WhatsApp ग्रुपमध्ये सामील करून शेअर मार्केट व IPO मध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. खोटा नफा दाखवणाऱ्या अॅपच्या माध्यमातून विश्वास निर्माण करून वारंवार पैसे गुंतवण्यास भाग पाडले. या प्रकरणात ₹1,30,02,000/- इतकी फसवणूक झाली. तिसऱ्या घटनेत दिनांक 06 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08 ते 10 वाजण्याच्या दरम्यान IMPS व RTGS द्वारे अनधिकृत व्यवहार करून ₹92,50,000/- इतकी रक्कम विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली. या प्रकरणात कोणताही OTP शेअर न करता खाते हॅक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 132/2026 नोंद करण्यात आला असून भा.न्या.सं. कलम 318(4) तसेच आयटी अॅक्ट 66(C), 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही घटनांमधून आरोपी नागरिकांचा विश्वास संपादन करून नंतर भीती किंवा लोभ निर्माण करत आर्थिक फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सायबर फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी अज्ञात कॉल, लिंक किंवा अॅपवर विश्वास ठेवू नये. OTP, PIN, पासवर्ड यांसारखी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. तसेच फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. बारामती शहर पोलिसांनी संबंधित बँक खात्यांवर फ्रीज कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

 


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *