आरोग्यक्राईमसामाजिक

घराच्या आडोशाला दारू विक्री; तांदुळवाडीत पोलिसांचा छापा, दोन महिलांवर गुन्हे


बारामती तालुका पोलिसांची कारवाई; महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल

बारामती संपादक-(विकी आगम)

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाई करत तांदुळवाडी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत दोन महिलांकडून एकूण ४ हजार ४०० रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली असून, दोघींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२६ रोजी तांदुळवाडी परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.

पहिल्या कारवाईत अलका रामचंद्र दुबळे (वय ४८, रा. तांदुळवाडी) हिच्या राहत्या घराच्या आडोशाला पिशवीमध्ये ठेवलेल्या देशी दारूच्या ९० मिलीच्या ४० बाटल्या आढळून आल्या. या दारूची एकूण किंमत १,६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तर दुसऱ्या कारवाईत गीताबाई अशोक अडागळे (रा. तांदुळवाडी) हिच्याकडून देशी दारूच्या ९० मिलीच्या २० बाटल्या, तसेच दुसऱ्या कंपनीच्या ८० बाटल्या, असा एकूण २,८०० रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला.

दोन्ही कारवायांमध्ये मिळून १२० देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत ४,४०० रुपये आहे.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१५/२०२६ आणि ४१६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार एकशिंगे, उगले, वाघ आणि खारतोडे यांच्या पथकाने केली. दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हवालदार महेश उगले व पोलीस हवालदार खारतोडे करीत आहेत.

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर दारू विक्रीवर पोलिसांची नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *