साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दिव्यांग मुलांसाठी स्नेहभोजन व वृक्षारोपण
बारामती, दि. ३१ जुलै : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जय लहुजी फ्रेंड सर्कल, साठेनगर, कसबा, बारामती यांच्या वतीने कसबा येथील शिवगुरू दिव्यांग मुलांच्या कार्यशाळेत (मतिमंद प्रवर्ग) स्नेहभोजन व वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमात दिव्यांग मुलांसोबत स्नेहभोजन करून त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण वाटण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमास बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन शेठ सातव, माळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सहयोग सातपुते, बारामती शहर पोलीस प्रभारी श्रीशैल चिवडशेट्टी, ज्येष्ठ नेते के. टी. जाधव, नगरसेवक गणेश जोजारे, पप्पू खरात, मुंबई पोलीस दलातील सागर अवघडे, सामाजिक कार्यकर्ते शुभम आयवळे, दत्ता बाबर, राहुल गायकवाड तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सोमनाथ पाटोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी जय लहुजी फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष केदार पाटोळे यांनी उपस्थित मान्यवर, दिव्यांग संस्था, कार्यकर्ते व सहकाऱ्यांचे आभार मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी किरण कसबे, दत्ता खरात, रोहित भोसले, अजय खरात, अमोल खुडे आणि मच्छिंद्र नेटके यांनी विशेष परिश्रम घेतले. दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थित मान्यवरांसह नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरला.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

