क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरसामाजिक

दौंडमध्ये हिंदू युवतीचे घरातून अपहरण; पिस्तुलाचा धाक, ₹५ लाखांची रोकड व ७ तोळे सोने लंपास – सखोल चौकशीची मागणी


दौंडमध्ये हिंदू युवतीचे घरातून अपहरण; पिस्तुलाचा धाक, ₹५ लाखांची रोकड व ७ तोळे सोने लंपास – सखोल चौकशीची मागणी

बारामती/संपादक-(विकी आगम)
दौंड तालुक्यातील बोरीभडक गावात एका २३ वर्षीय हिंदू युवतीचे घरात घुसून भरदिवसा कथित अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवत युवतीच्या कुटुंबीयांना मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि युवतीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून घेऊन गेल्याचा आरोप यवत पोलीस ठाण्यात दाखल FIR मध्ये करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, या प्रकरणी कमरुद्दीन मुकीम शेख (रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे) व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध अपहरण, चोरी, शस्त्र कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, कुटुंबीयांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पिस्तूल दाखवत “गोळ्या घालून ठार मारतो” अशी धमकी दिली. युवतीच्या वडिलांना ढकलून मारहाण करण्यात आली, तर आईलाही मारहाण करून शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे. युवतीला घेऊन जाताना आरोपींनी घरातील ₹५,०१,५०० ची रोकड आणि सुमारे ७ तोळे सोन्याचा गंठण देखील लंपास केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेमुळे बोरीभडकसह संपूर्ण दौंड तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, काही हिंदू संघटनांनी या प्रकरणाची सर्व बाजूंनी सखोल चौकशी करून प्रेमसंबंधाच्या नावाखाली फसवणूक किंवा इतर कोणताही व्यापक कट होता का, याची तपास यंत्रणांनी पडताळणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच आरोपींना तातडीने अटक करून पीडित युवतीचा सुरक्षित शोध घ्यावा आणि कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. यवत पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणातील फिर्यादीतील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दौंड तालुक्यातील बोरीभडक गावात एका २३ वर्षीय हिंदू युवतीचे घरात घुसून भरदिवसा कथित अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवत युवतीच्या कुटुंबीयांना मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि युवतीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून घेऊन गेल्याचा आरोप यवत पोलीस ठाण्यात दाखल FIR मध्ये करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, या प्रकरणी कमरुद्दीन मुकीम शेख (रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे) व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध अपहरण, चोरी, शस्त्र कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, कुटुंबीयांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पिस्तूल दाखवत “गोळ्या घालून ठार मारतो” अशी धमकी दिली. युवतीच्या वडिलांना ढकलून मारहाण करण्यात आली, तर आईलाही मारहाण करून शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे. युवतीला घेऊन जाताना आरोपींनी घरातील ₹५,०१,५०० ची रोकड आणि सुमारे ७ तोळे सोन्याचा गंठण देखील लंपास केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेमुळे बोरीभडकसह संपूर्ण दौंड तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, काही हिंदू संघटनांनी या प्रकरणाची सर्व बाजूंनी सखोल चौकशी करून प्रेमसंबंधाच्या नावाखाली फसवणूक किंवा इतर कोणताही व्यापक कट होता का, याची तपास यंत्रणांनी पडताळणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच आरोपींना तातडीने अटक करून पीडित युवतीचा सुरक्षित शोध घ्यावा आणि कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. यवत पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणातील फिर्यादीतील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *