शिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

एसएसपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे पिंपळे गुरव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


पिंपळे गुरव :प्रतिनिधी: एसएसपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अंतर्गत गणेश इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, दापोडी (GEMS) शाळेचा शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठीचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम “Spectrum of GEMS” या संकल्पनेवर आधारित दिमाखात पार पडला. हा कार्यक्रम नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, पिंपळे गुरव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली ही गणेश वंदना अत्यंत जोरदार व भावपूर्ण असून उपस्थितांची मने जिंकून गेली.मुख्याध्यापिका सौ. विजया लेंभे यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर करून शैक्षणिक व सह शैक्षणिक उपक्रमाचा आढावा घेतला.

इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी छोटा भीम, मोटू-पतलू, टॉम अँड जेरी या लोकप्रिय कार्टून थीमवर आधारित नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
इयत्ता चौथी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी “गुरु-शिष्य” थीमवर आधारित सादरीकरण करत गुरूंचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. त्यानंतर सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक थीमवर आधारित नृत्य व नाट्यसादरीकरण सादर केले.
कार्यक्रमाचा समारोप अत्यंत भारावलेल्या वातावरणात झाला. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत उत्कट व प्रभावीपणे साकारली. या प्रसंगी रंगमंदिरात शिवगर्जना निनादली आणि उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून अभिवादन केले.


या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. श्रीपाल सबनीस (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) तसेच सन्माननीय पाहुणे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. एस. बी. पाटील , विश्वनाथ प्रभू पाटील (उपाध्यक्ष) ,गणेश पाटील (खजिनदार), चंद्रशेखर प्रभू पाटील (सचिव) , सहयोगी संचालक सुनील शेवाळे, प्रशासन अधिकारी प्रकाश गायकवाड, डॉ. प्रवीण कुमार साबळे, डॉ. अभिजीत चव्हाण, GIS मुख्याध्यापिका- सीओना त्रिभुवन, आभा सिंग, प्ले स्कूल च्या रिचेल पिल्ले उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका सौ. विजया लेंभे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *