महाराष्ट्रराजकीयसामाजिक

प्रभाग २६ मध्ये गणेश कस्पटे यांना खान्देश वाशीयांचा भक्कम पाठिंबा


विशालनगरमध्ये खानदेश वाशीयांचा स्नेहमेळावा संपन्न

कानबाई माता व सप्तशृंगी मातेच्या भक्तीगीतांमधून खान्देशी संस्कृतीचे दर्शन.

पिंपळे निलख : (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ (पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटे वस्ती, वाकड) येथून निवडणूक लढवत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे यांना खान्देश वाशीयांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने गणेश कस्पटे व त्यांच्या पत्नी सारिका गणेश कस्पटे यांनी प्रभागातील विविध भागांत भेटीगाठी, चर्चासत्रे, कोपरा सभा व मेळावे सुरू केले असून, नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर नुकताच खान्देश वाणी मित्रमंडळ, विशालनगर यांच्या वतीने गणेश कस्पटे व सारिका कस्पटे यांच्यासाठी भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या स्नेहमेळाव्यात खानदेशाची आराध्य दैवत कानबाई माता व सप्तशृंगी मातेच्या भक्तीगीतांचा भक्तिमय कार्यक्रम सादर करण्यात आला. विशालनगर परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. खानदेशी संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला.
गणेश कस्पटे व सारिका कस्पटे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, त्यांच्या भेटीगाठीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. मोठ्या संख्येने खानदेश वाशी नागरिक, कार्यकर्ते व महिला वर्गाने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राहुल उंडे, बाळकृष्ण अमृतकर, मनोज ब्राह्मणकर, विजय बागडे, तुषार येवले यांच्यासह खानदेश वाणी मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *