आरोग्यउद्योगक्राईममहत्त्वाचेसामाजिक

बारामतीत ग्राहकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न; भेसळयुक्त मिठाई आणि डुप्लिकेट कॉस्मेटिक्स विक्रीची चर्चा


बारामती/संपादक-(विकी आगम)                                बारामती शहरात सध्या ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर मुद्द्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शहरातील काही स्वीट दुकानांमध्ये भेसळयुक्त मिठाई विकली जात असल्याचा तर काही कॉस्मेटिक दुकानांमध्ये नामांकित कंपन्यांच्या नावाखाली डुप्लिकेट आणि बनावट उत्पादने विक्रीस ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. विशेषतः मिठाईमध्ये कृत्रिम रंग, निकृष्ट दर्जाचे तेल, केमिकलयुक्त पदार्थ तसेच आरोग्यास अपायकारक घटकांचा वापर होत असल्याच्या चर्चा आहेत. अशा पदार्थांमुळे पचनाचे विकार, त्वचारोग आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, डुप्लिकेट कॉस्मेटिक उत्पादनांमुळे त्वचेचे नुकसान, अ‍ॅलर्जी तसेच इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, अशी भीतीही व्यक्त होत आहे. याबाबत संबंधित प्रशासन, FDA विभाग तसेच ग्राहक संरक्षण विभागाने बारामती शहरातील मिठाई आणि कॉस्मेटिक दुकानांची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. संशयास्पद उत्पादनांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवावेत तसेच बनावट आणि भेसळयुक्त माल आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. “नामांकित कंपन्यांच्या नावाखाली डुप्लिकेट उत्पादने विकली जात असतील तर ती ग्राहकांची फसवणूक असून जनतेच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रकार आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार वस्तू मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सणासुदीच्या काळात मिठाई आणि कॉस्मेटिक वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने अचानक तपासणी मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा बारामतीकरांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना बिल घ्यावे, उत्पादनाची माहिती तपासावी आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *