आरोग्यक्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

बारामतीत पोलिसांची जोरदार कारवाई; हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त


बारामती (संपादक-विकी आगम )

बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक आणि नियोजनबद्ध कारवाई करत मोठा फटका दिला आहे. सलग चार दिवस राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुणवडी, बांदलवाडी, आमराई या भागांमध्ये एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे ड्रम, भांडी आणि साहित्य जप्त करण्यात आले, तसेच मोठ्या प्रमाणात तयार दारू हस्तगत करण्यात आली. जप्त साहित्य जागीच नष्ट करून अवैध व्यवसायावर तात्काळ आळा घालण्यात आला. दरम्यान, गेल्या चार दिवसांत पोलिसांनी गुणवडी, बांदलवाडी, आमराई, पिंपळी, लिमटेक, कसबा आणि साठेनगर परिसरात पायी पेट्रोलिंग करत घरगुती भट्ट्यांचा नायनाट केला. दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारी साधने नष्ट करून अवैध साठ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पोलिसांनी सामाजिक बांधिलकीही जपली. गावोगावी जनजागृती करत महिला वर्गाशी संवाद साधण्यात आला. दारूबंदी कायद्याबाबत मार्गदर्शन करत अवैध दारूमुळे होणारे आरोग्य व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट करण्यात आले. तसेच पारंपरिक दारू व्यवसाय करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करून त्यांना पर्यायी उपजीविकेकडे वळण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “अवैध दारू विक्रीविरोधातील मोहीम सातत्याने सुरू राहील. कोणताही बेकायदेशीर व्यवसाय आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी तत्काळ माहिती देऊन सहकार्य करावे.” या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अवैध धंद्यांना आळा बसेल आणि कायदा सुव्यवस्था अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, PSI भंडारे, पो.हवा. यशवंत पवार, रामचंद्र शिंदे, अभिजीत कांबळे, एएसआय संदीप जाधव, महिला पो.शि. सीमा निंबाळकर, राजश्री जगताप, पो.शि. अमोल देवकाते, अक्षय सिताफ, विशाल शिंदे, विजय ओमासे आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.  “अवैध दारू म्हणजे आरोग्य व समाजासाठी गंभीर धोका” — नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित बारामती शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *