क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहर

बारामतीत पोलिसांची धाड; १७ जनावरांना दिला जीवदान


बारामती/संपादक-(विकी आगम)
गोवंश कत्तल व अवैध वाहतूक प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी १९ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री गोकुळनगर, मळद (मळद–फलटण रोड) येथे छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत १० गायी व ७ बैल असे एकूण १७ गोवंश जनावरे जप्त करून सुरक्षिततेसाठी गोशाळेत जमा करण्यात आली. पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 150/2026 दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र गोवंश वध निबंधन व गोवंश संवर्धन अधिनियम, २०१५ तसेच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, १९६० अंतर्गत कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पो.उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, सहाय्यक पो.उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह पथकाने छापा टाकला फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची तपासणी केली जात आहे. आवश्यक असल्यास MCOCA अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. जप्त जनावरे मळद येथील दयोदय गोशाळेत सुरक्षित ठेवण्यात आली असून त्यांची काळजी घेतली जात आहे. गोवंश हत्या व प्राण्यांवरील क्रूरतेविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *