महाराष्ट्रशहरसामाजिक

युगेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे कार्याध्यक्ष ओमकार विकास खोत पाटील यांच्या पुढाकारातून वारकरी सेवेचा आदर्श; संत तुकाराम व संत सोपानकाका पालखी सोहळ्यात भव्य अन्नदान


बारामती/संपादक-(विकी आगम)
युगेंद्र दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज तसेच संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त बारामतीत आलेल्या हजारो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे कार्याध्यक्ष ओमकार विकास खोत पाटील यांच्या वतीने भव्य अन्नदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यासोबतच वारकरी भक्तांना ड्राय फ्रुट, बिस्कीट, चहा आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वाटपही करण्यात आले.

अखंड वारीदरम्यान वारकरी भक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना वेळेवर भोजन व अल्पोपहार मिळावा, या सेवाभावातून हा उपक्रम राबविण्यात आला. मोठ्या संख्येने वारकरी भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेत आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेत वारकऱ्यांचे स्वागत केले. प्रेम, आपुलकी आणि सेवाभावाने करण्यात आलेल्या या अन्नदान व अल्पोपहार वाटपाचे वारकरी, नागरिक आणि उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून वारकरी सेवेत सक्रिय सहभाग घेतला.

 


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *