शहरसामाजिक

रेणुका नगर रहिवासी संघाचा ‘एक घर – एक झाड’ हरित उपक्रम उत्साहात; २५१ देशी वृक्षांचे मोफत वाटप


बारामती/संपादक-(विकी आगम)
स्व. आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त रेणुका नगर रहिवासी संघाच्या वतीने रेणुका नगर, फलटण रोड, कसबा येथे “एक घर – एक झाड” या हरित उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांतर्गत २५१ देशी वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले.
या वेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत प्रत्येक घरात किमान एक देशी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देशी वृक्ष लागवडीचे महत्त्व उपस्थित मान्यवरांनी अधोरेखित केले.


कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष किरणभाऊ इंगळे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, साधू बल्लाळ, चिवाशेठ जोजारे, सचिन काकडे, प्रतीक जगताप, शुभम पडळकर तसेच पै. गणेश आटपडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
हा उपक्रम मा. जनसेवक प्रतिक शिवाजीराव ढवाण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी रेणुका नगर रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष योगेश संजय महाडिक यांनी उपस्थित मान्यवर, नागरिक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाबुलाल शेख, जमीर बागवान, अमीन अन्सारी, रणजित मोतीकर, आशपाक शेख, रफिक शिकलकर, इम्तियाज तांबोळी, अकबर गायकवाड, कर्मवीर खन्ना, अमीर शेख आणि शाबीर तांबोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *