सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली

बारामती / उपसंपादक : विवेक साळुंके
गौमातेला राष्ट्रपशू घोषित करावे या मागणीसाठी कासम कुरेशी यांनी सुरू केलेल्या उपोषणावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नागरिकांनी या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही कृती म्हणजे “सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली” अशीच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बारामती परिसरात कासम कुरेशी यांची ओळख दीर्घकाळापासून मांस व्यवसायाशी संबंधित व्यक्ती म्हणून राहिली आहे. त्यामुळे गौसंरक्षण आणि गौमातेला राष्ट्रपशूचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी त्यांनी अचानक घेतलेली भूमिका अनेकांना विसंगत वाटत आहे.
काही नागरिकांचा आरोप आहे की, जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःची प्रतिमा बदलण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या उपोषणामागील उद्देशाबाबत समाजात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, अनेक नागरिकांनी कासम कुरेशी यांच्या भूमिकेतील बदलाबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
या विषयावर संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे उपोषणामागील नेमकी भूमिका आणि उद्देश स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




