सामाजिक

सेवाभावातून वाढदिवस साजरा; ओंकार खोत यांचा समाजहिताचा पुढाकार, मंदिर सुशोभीकरणापासून गरजूंच्या मदतीपर्यंत विविध उपक्रम


बारामती / संपादक – विकी आगम
बारामती शहरातील सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असणारे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती शहर युवक कार्याध्यक्ष श्री. ओंकार खोत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनोखा सामाजिक उपक्रम राबवत समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली आहे.

समाजात काम करत असताना नागरिकांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात देणे, या भूमिकेतून ओंकार खोत सातत्याने कार्यरत असतात. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील भगवान शंकराच्या मूर्तीची रंगरंगोटी, मंदिर परिसराची स्वच्छता तसेच सुशोभीकरणाचे विविध उपक्रम राबविले. धार्मिक स्थळ स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. यासोबतच आरोग्य क्षेत्रातही सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी ओंकार खोत नेहमीच पुढाकार घेत असतात. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना मदतीचा हात देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले जात आहे.“वाढदिवस हा केवळ उत्सवाचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी आहे,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ओंकार खोत यांच्या सामाजिक कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *