ताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्र

कार्यकर्ता घडविण्याचा संकल्प! अभाविप बारामती जिल्ह्याचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग दौंडमध्ये


बारामती/संपादक-(विकी आगम)

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये (अभाविप) कार्यकर्ता प्रशिक्षणाला विशेष महत्त्व दिले जाते. प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विद्यार्थी हित, सामाजिक आणि राष्ट्रहिताशी संबंधित विविध उपक्रम वर्षभर प्रभावीपणे राबविले जातात. याच उद्देशाने अभाविप बारामती जिल्ह्याच्या वतीने तीन दिवसीय जिल्हा अभ्यासवर्ग (कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग) आयोजित करण्यात आला आहे. हा अभ्यासवर्ग दि. २६, २७ व २८ जून २०२६ रोजी दौंड शहरात संपन्न होणार आहे. या निवासी अभ्यासवर्गामध्ये जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना वैचारिक, संघटनात्मक आणि कार्यपद्धतीविषयक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये कार्यकर्ता व्यवहार, संघटनात्मक बांधणी, व्यावहारिक प्रशिक्षण, सदस्यता अभियान तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासवर्गासाठी पुरंदर, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी होणार असून, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी कार्य अधिक प्रभावीपणे उभे करणे, कार्यकर्त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, नेतृत्वगुण व कौशल्य विकसित करणे तसेच आगामी सदस्यता अभियानाची दिशा निश्चित करणे, हा या अभ्यासवर्गामागील प्रमुख उद्देश आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थी हित, राष्ट्रनिर्माण आणि समाज परिवर्तनाच्या ध्येयाने सातत्याने कार्यरत असून, या अभ्यासवर्गातून कार्यकर्त्यांना अधिक सक्षमपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास अभाविप बारामती जिल्ह्याने व्यक्त केला आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *