ताज्या घडामोडी

अभाविपच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत अभ्यासवर्गात बारामतीच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाची दायित्वे; ओंकार तावरे यांच्यावर तिहेरी जबाबदारी


बारामती/संपादक-(विकी आगम)

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) पश्चिम महाराष्ट्र प्रांत अभ्यासवर्ग दि. ५ ते ८ जून २०२६ दरम्यान शिर्डी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या अभ्यासवर्गात पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत संघटनात्मक बांधणी, वैचारिक अधिष्ठान आणि नेतृत्व विकासासंदर्भातील विविध सत्रांचा लाभ घेतला. अभ्यासवर्गादरम्यान संघटनात्मक दायित्वांची घोषणा करण्यात आली. यामध्ये बारामती जिल्ह्यातील युवा कार्यकर्ते ओंकार विजय तावरे यांच्यावर महत्त्वाची तिहेरी जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांची बारामती जिल्हा संयोजक, प्रदेश सोशल मीडिया समिती सदस्य तसेच प्रदेश क्यूआरटी (QRT) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संघटनेच्या विस्ताराच्या दृष्टीने तालुकास्तरावरील नव्या दायित्वांचीही घोषणा करण्यात आली. उत्कर्ष बोडके यांची इंदापूर तालुका संयोजक, आदित्य गुळसुनकर यांची बारामती तालुका संयोजक आणि रुद्राक्ष लवटे यांची दौंड तालुका संयोजक म्हणून निवड करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे बारामती जिल्ह्यासह परिसरातील विद्यार्थी चळवळीला नवसंजीवनी मिळणार असून विद्यार्थी हित, शैक्षणिक प्रश्न आणि सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *