बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; बेकायदेशीर गोवंश वाहतुकीवर छापा, दोन वाहने व चार जनावरे ताब्यात
बारामती | उपसंपादक – (विवेक साळुंके)
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गुणवडी रोड परिसरात गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन पिकअप वाहने व चार गोवंश जनावरे ताब्यात घेतली.कारवाईदरम्यान वाहन क्रमांक MH45AX0859 (महिंद्रा वीरो) व MH12VF1033 (महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप) या वाहनांमधून एकूण चार गोवंश जनावरे आढळून आली. तपासात जनावरांची वाहतूक अत्यंत गर्दीने व अमानुष पद्धतीने करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच जनावरांसाठी आवश्यक चारा, पाणी, विश्रांती व वैध वाहतूक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे समोर आले. या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 225/2026 अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976 तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री. संदीप सिंह गिल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, महिला पोलीस हवालदार सीमा साबळे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे व पोलीस शिपाई ऋषिकेश जाधव यांनी सहभाग घेतला. बारामती शहर पोलिसांनी जानेवारी 2026 पासून आतापर्यंत सातत्यपूर्ण मोहिम राबवून 41 गोवंश जनावरे बेकायदेशीर वाहतुकीतून मुक्त करून गोशाळांमध्ये सुरक्षित दाखल केली आहेत.
पोलीस निरीक्षक : श्रीशैल चिवडशेट्टी
बारामती शहर पोलीस स्टेशन
आवाहन :
गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक, जनावरांवरील क्रूरता किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तात्काळ डायल 112 किंवा बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




