महाराष्ट्रशहरसामाजिक

बारामतीत संयुक्त जयंती सोहळा; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग


बारामती/ संपादक-(विकी आगम) 
बारामती, दि. ३ मे २०२६ — तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त बारामती येथे भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त उत्सव समिती आणि संघर्षशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहभोजन व भेटवस्तू वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते मा. योगेंद्रदादा पवार उपस्थित होते. तसेच नगरसेवक किरणभाऊ इंगळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमात स्थानिक कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. एकोप्याचे वातावरण आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात एकात्मता आणि समतेचा मजबूत संदेश पोहोचवण्यात यश आले.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *