आरोग्यताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

कारभारी सर्कल परिसरातील ATM मध्ये कचऱ्याचा ढिग ग्राहक हैराण, बँकेचे दुर्लक्ष


बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती शहरातील कसबा परिसरातील कारभारी सर्कल येथे असलेल्या IDBI बँकेच्या ATM केंद्रात अत्यंत अस्वच्छ परिस्थिती पाहायला मिळत आहे. ATMच्या आत मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.दररोज अनेक नागरिक पैसे काढण्यासाठी या ATMचा वापर करतात. मात्र, आतमध्ये पसरलेला कचरा, धूळ व अस्वच्छता यामुळे ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही वेळा दुर्गंधीमुळे ATMमध्ये थांबणेही कठीण होत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.सदर प्रकारामुळे बँक व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, स्वच्छतेसारख्या मूलभूत बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *