उद्योगताज्या घडामोडीदेश-विदेशमहत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहर

बारामती आणि राहुरीत पोटनिवडणूक जाहीर राजकीय पक्षांची जोरदार तयारी


महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे भारत निवडणूक आयोगने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताच दोन्ही मतदारसंघांत राजकीय हालचालींना वेग आला आहे जाहीर कार्यक्रमानुसार २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून ४ मे २०२६ रोजी मतमोजणी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून प्रमुख राजकीय पक्षांनीही तयारीला सुरुवात केली आहे बारामती मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली होती तर राहुरी मतदारसंघातही आमदारांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान, या दोन्ही मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचाराची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बारामती आणि राहुरीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *