ताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरसामाजिक

बारामतीत आचारसंहिता लागू नियम मोडल्यास कडक कारवाईचा इशारा


बारामती/संपादक-(विकी आगम)

भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई व पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या निर्देशानुसार दिनांक 15 मार्च 2026 पासून बारामती शहर परिसरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.यासंदर्भात बारामती शहर पोलीस स्टेशन कडून नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.आचारसंहितेच्या कालावधीत सभा, मोर्चे, प्रचार रॅली, मिरवणुका, ध्वनीक्षेपकाचा वापर तसेच बॅनर, पोस्टर, फ्लेक्स किंवा भित्तीपत्रके लावण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. परवानगीशिवाय कार्यक्रम घेणे, सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिराती लावणे किंवा मतदारांना पैसे, भेटवस्तू व इतर प्रलोभने देणे हे कायद्याने दंडनीय असल्याचे पोलिसांनी सांगितले.तसेच जातीय किंवा धार्मिक भावना भडकविणारी वक्तव्ये करणे, सोशल मीडियावर अफवा किंवा चुकीची माहिती पसरवणे यावरही कडक कारवाई केली जाणार आहे.आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बारामती शहरात विशेष गस्त, नाकाबंदी, वाहन तपासणी मोहीम व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *