क्राईमशहरसामाजिक

बारामतीत बेमुदत उपोषण सुरू प्रशासनाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष


बारामती शहरात गेल्या काही दिवसापासून अवैधरित्या सुरू असलेल्या धंद्या विरोधात बारामती मधील भाजपचे काही पदाधिकारी अमोल बेमुदत उपोषणाला बसले असून बारामती शहरातील अवैधरित्या सुरू असलेले बेकायदेशीर धंदे बंद व्हावेत ही मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे गेल्या पंधरा दिवसापासून भाजप कार्यकर्ते बेमुदत अमोल उपोषणाला बसले असून पोलीस शासनाने याकडे जाणीवपूर्वक का दुर्लक्ष करीत आहे असा सवाल उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

बारामती शहरात हातभट्टी गावठी दारू चक्री जुगार मटका यासारखे अवैधरित्या चालणारे व्यवसाय तात्काळ बंद करावेत या मागणीसाठी भाजप कार्यकर्ते आकाश दामोदरे शिवसेना बारामती शहर प्रमुख वस्ताद पप्पू माने यांच्यासह इतर कार्यकर्ते अमर उपोषणाला बसले असून त्यांच्याकडून पाच मागण्या बारामती प्रशासनाला करण्यात आल्या असून यामध्ये बारामती शहरातील अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावे तसेच बारामती हद्दीत विद्यमान नगरसेवकांनी जे अतिक्रमण केली आहेत ती अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.असं असताना प्रशासन उपोषणकर्त्यांच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक का दुर्लक्ष करीत आहे असा सवाल उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

बारामती प्रशासनातील काही कर्मचारी आर्थिक हितसंबंध साधून अवैधरित्याव्यवसाय करणाऱ्या सोबत तडजोडी करत असल्याचा चर्चा बारामती शहरात रंगू लागले असून येणाऱ्या कालावधीमध्ये या कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून केली जाऊ लागले आहेत जर येणाऱ्या आठ दिवसात या कर्मचाऱ्यांवर आणि अवैधरित्या अवैध धंदे करणाऱ्या व कारवाई केली नाही तर उपोषण अधिक तीव्र करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी बारामती प्रशासनाला दिला आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *