शितोळे शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात …..
सांगवी:- स्मार्ट सिटीच्या नियोजनात विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली पाहिजे व त्यांचा विचार करून नियोजन केले पाहिजे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या या विचारांकडे ही आपण लक्ष दिले पाहिजे. तसेच विध्यार्थ्याना यश मिळावायचे असेल तर अपार कष्ट केले पाहिजे असे मत प्रमुख पाहुणे श्रीपद्मावती प्रेसिकॉम प्रा. लि. चे एम. डी. व उद्योजक दीपक पाटील यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै.सौ.शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, शिशुविहार, नूतन माध्यमिक विद्यालय सांगवी आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते.
संस्थेचे संस्थापक, गुरुवर्य ,कै. प्राचार्य टी. आर. वाळके यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र संस्थेचे उपाध्यक्ष मा. संजीव वाळके यांच्या वतीने गोल्ड मेडल आदर्श शिक्षक पुरस्कार शाळेच्या शिक्षिका हेमलता नवले यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गोल्ड मेडल प्रधान करण्यात आले. तसेंच शाळेच्या सेविका सौं. म्हस्के मॅडम यांना आदर्श सेविका पुरस्कार प्रधान करण्यात आला.संस्थेचे कार्याध्यक्ष व पि. चिं. मनपा चे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष मा. प्रशांत शितोळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

पिंपरी चिंचवड विद्यापीठ नियमक मंडळाचे सदस्य व उद्योजक मा.सलीम शिकलगार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी इ 10 वी तील गणित विषयात प्रथम कमांक मिळवलेल्या विध्यार्थ्याला 10000 रु चे पारितोषिक दिले. तसेच राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य कै. आबासाहेब जंगले यांच्या समरणार्थ संस्थेचे सदस्य श्री. जयप्रकाश जंगले व निवृत्त प्राचार्य कै. गणपतराव यादव यांच्या समरणार्थ सदस्य श्री. विजयसिंह यादव यांनी इ. 10 वी मध्ये प्रथम येणाऱ्या विध्यार्थ्याला प्रत्येकी 5000 रु. चे पारितोषिक दिले. या तिन्ही पारितोषिकची मानकरी कु. वृषाली इंगळे ही ठरली तिला त्यांच्याच हस्ते या पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेतील एकूण 430 विध्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांचा विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम झाला. यावर्षी भारत देशाची विविधता व सर्व राज्यांची परंपरा व संस्कृती वर असलेल्या गीतावर विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली .याप्रसंगी संस्थेचे खजिनदार रामभाऊ खोडदे, सचिव तुळशीराम नवले, उपाध्यक्ष संजीव वाळके, शिक्षण तज्ञ डॉ. दिलीप गरुड, सदस्य प्रकाश ढोरे, मनीष पाटील, सातारा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष संजय चव्हाण ,खजिनदार महेश भागवत,मुख्याध्यपिका सुरेखा लांघी, विद्या ढमाले, सविता माने,माध्यमिक विभाग प्रमुख शितल शितोळे, इंग्रजी माध्यम प्रमुख शोभा वरठी , शिशु विहार प्रमुख संगीता सूर्यवंशी, नर्सरी प्रमुख शितल गरसुंड .शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष व पदाधिकारी, शिक्षक पालक संघांचे उपाध्यक्ष व पदाधिकारी, परिवहन समितीचे अध्यक्ष, शिक्षक,पालक, विध्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनीता टेकवडे, हेमलता नवले, सीमा पाटील ,स्वप्नील कदम, मनीषा लाड, पंचशीला वाघमारे, भारती घोरपडे, श्रद्धा जाधव, गायत्री कोकाटे, संध्या पुरोहित ,माने मॅडम, नीता ढमाले, भाग्यश्री करे,निर्मला भोईटे ,कुसुम ढमाले ,मनीषा गायकवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी व निवेदन आभार दत्तात्रय जगताप यांनी केले.






