महाराष्ट्रसामाजिक

पिंपळे गुरवला रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद


कै. लीलाबाई चंपालालजी गुगळे यांच्या स्मरणार्थ सांगवी परिसर महेश मंडळातर्फे आयोजन

पिंपरी : प्रतिनिधी : भगवान का दिया अल्प नही होता, रक्तदान कोई विकल्प नही होता ” या युक्तीनुसार दरवर्षीप्रमाणे सांगवी परिसर महेश मंडळातर्फे कै. लीलाबाई चंपालालजी गुगळे यांच्या स्मरणार्थ ३२ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहातील बहुउद्देशीय हॉलमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले .संदीप गुगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या वेळी सतीश लोहिया, मुकुंद तापडिया, सत्यनारायण बांगड, मनोज अटल आदी उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरात १४७ रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. रक्तसंकलनसाठी पूना हॉस्पिटल रक्त पेढी व जनसेवा रक्तपेढ़ीने सहकार्य केले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी कुलदीप बजाज ,मुकुंद तापडिया ,गजानंद बिहाणी , दीपेश मालानी, पंकज टावरी यांनी सहकार्य केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *