माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची जोरदार चर्चा?
मालेगाव / संपादक -(विकी आगम )
माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाइन जुगार, अवैध दारू विक्री आणि प्रतिबंधित गुटखा विक्री जोरात सुरू असल्याची चर्चा सध्या परिसरात रंगू लागली आहे. या कथित अवैध धंद्यांबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असून, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
माळेगाव परिसरात नेमके कोणत्या ठिकाणी हे प्रकार सुरू आहेत, कोणाच्या माध्यमातून हे व्यवहार चालतात आणि यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेची भूमिका काय, अशा चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहेत.
ऑनलाइन जुगारामुळे तरुणाईच्या आर्थिक नुकसानीची चिंता, अवैध दारू विक्रीमुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्न आणि प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा रंगू लागली आहे.
एकीकडे अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे दावे केले जात असताना दुसरीकडे माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे प्रकार सुरू असल्याची चर्चा का होत आहे? या चर्चांमागील वस्तुस्थिती काय आहे? याची पडताळणी होणे गरजेचे आहे.
माळेगाव पोलीस प्रशासनाला या चर्चांची माहिती आहे का? वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेणार का? संबंधित ठिकाणांची तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणली जाणार का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या चर्चांची गांभीर्याने दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी. अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आता या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी माळेगाव पोलीस प्रशासन नेमकी कोणती पावले उचलणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

