वारकरी सेवेचा वसा कायम; श्री कन्हैय्या मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम चर्चेत
बारामती/संपादक-(विकी आगम)
संतश्रेष्ठ संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज बारामती शहरात उत्साहात आगमन झाले. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे श्री कन्हैय्या मित्र मंडळ व राहुलदादा नेवसे प्रतिष्ठान, कसबा, बारामती यांच्या वतीने वारकरी भाविकांसाठी सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकरी भाविकांना केळी व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून हा उपक्रम अनेक वर्षांपासून सातत्याने राबविला जात असून, यंदाही मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा उपक्रम पार पडला.
या उपक्रमात अमित बापू आगम, संतोषदादा नेवसे पाटील, राजू मुलानी, सोनू देवकर, उमेश बनकर, दिनेश शेठ गायकवाड, गणेश शेठ गायकवाड, संतोषदादा म्हेत्रे, बाळासाहेब मोटे, कमलाकर मोटे, भाऊ शिरसाठ, सचिन डमाळ, संजय लोले, अमोल पानसरे, चिकू पाटील, सुजित रणदिवे, अमोल सावंत, नंदराज वाघमोडे, रामभाऊ बोडरे, राजेंद्र काळे, शिवराज नेवसे, वसीम शेख, नवीन प्रजापती, संजय गवळी आदींनी सहभाग घेत वारकरी सेवेचे कार्य पार पाडले.
या सेवाभावी उपक्रमाचे वारकरी भाविकांनी स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




