आरोग्यताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; ६ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी


प्रतिनिधी : विवेक साळुंके भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टी व विजांच्या कडकडाटाचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आवश्यकतेनुसार शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कामे करावीत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडणे टाळण्याचे, नदी-नाले, पूरग्रस्त भाग व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे तसेच हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *