आरोग्यउद्योगताज्या घडामोडीदेश-विदेशमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेत बारामती उपजिल्हा रुग्णालयाची उल्लेखनीय कामगिरी..


प्रतिनिधी : विवेक साळुंके
राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम २०२६ अंतर्गत बारामती शहरात राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत उद्दिष्टाच्या सुमारे ८० टक्के म्हणजेच ९,०७० बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

ही मोहीम डॉ. महेश सोपानराव जगताप, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे लसीकरण मोहिमेला गती मिळाली आहे.

यावेळी डॉ. महेश जगताप यांनी पालकांना आवाहन केले की, ५ वर्षांखालील एकही बालक पोलिओच्या डोसपासून वंचित राहू देऊ नका. आपल्या परिसरातील लसीकरण केंद्रावर किंवा आरोग्य पथकाकडून आपल्या पाल्याला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे त्यांनी सांगितले.

बारामती शहरात शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून घरोघरी भेटी देऊन उर्वरित बालकांचे लसीकरण करण्याचे काम सुरू होणार असून, लवकरच १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास डॉ. महेश सोपानराव जगताप यांनी व्यक्त केला आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *