शहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वस्तीगृहाच्या अध्यक्षपदी गणेश सोनवणे


बारामती/संपादक-(विकी आगम)
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृहाच्या कार्यकारिणीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी गणेश शिवराम सोनवणे यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीमध्ये चेअरमन (अध्यक्ष) म्हणून गणेश शिवराम सोनवणे, उपाध्यक्ष म्हणून प्रतिभा संजय मोरे, सचिव म्हणून धनपाल विश्वनाथ भोसले, सहसचिव म्हणून सुशील कुमार सोनवणे तर खजिनदार म्हणून विजय नामदेव सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी माजी चेअरमन अशोक (अण्णा) सोनवणे, संजय मोरे तसेच दयानंद मिसाळ सर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश शिवराम सोनवणे हे अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असून वंचित व गरजू घटकांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि संघटन कौशल्याचा विचार करून त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे उपस्थितांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष गणेश शिवराम सोनवणे यांनी वस्तीगृहाच्या सर्वांगीण विकासासाठी, विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच संस्थेची सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे जपण्यासाठी सर्व पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधवांना सोबत घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून संस्थेच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी अधिक प्रभावी उपक्रम राबविले जातील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *