अ.ब.क.ड. उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी बारामतीत लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाचे धरणे आंदोलन सरकारने तात्काळ निर्णय घेण्याची मागणी; तहसील कार्यालयासमोर समाजबांधवांचा सहभाग
बारामती/संपादक -(विकी आगम) अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये अ.ब.क.ड. उपवर्गीकरण करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने बारामती तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत समान पद्धतीने पोहोचण्यासाठी अ.ब.क.ड. उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. राज्य सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. आंदोलनात लहुजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास (दादा) सकट, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पप्पू भिसे, बारामती तालुका पूर्व अध्यक्ष रामभाऊ भिसे, तालुका पश्चिम अध्यक्ष विजय आगलावे, माजी तालुकाध्यक्ष सूरज खंडाळे, बारामती शहर युवक अध्यक्ष आकाश पाटोळे, शहराध्यक्ष अतुल गायकवाड, इंदापूर तालुका अध्यक्ष अजय सोनवणे, युवक उपाध्यक्ष अमोल भिसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब चांदणे, सचिन माने, जालिंदर घोडे, सुधीर घोडे, सागर सकट, संजय नेटके, तानाजी सोनवणे, ईश्वर कुचेकर, धनाजी यादव, बाळासो साठे, संदीप आवळे, हनुमंत बाबर, प्रशांत बाबर, विनोद ननवरे, अमोल इंगळे, अतुल ननवरे, राहुल खरात यांची उपस्थिती होती. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य के. टी. (आप्पा) जाधव, माजी उपनगराध्यक्ष विजयराव खरात, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते बापू शेंडगे, पोलीस पाटील सचिन मोरे, राजेंद्र भिसे, दीपक दनाने, सचिन जाधव, अॅड. सोमनाथ पाटोळे, दीपक लोंढे, विजय नेटके, ओंकार जाधव, दीपक तुपे, संदीप नेटके, बाबू खरात, सचिन अवघडे, माही खरात, सुजय रणदिवे, सनी खरात, अमोल खरात, मयूर भिसे, कार्तिक भिसे यांच्यासह महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनुसूचित जातींच्या अ.ब.क.ड. उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




