आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या टोळीतील सात आरोपींच्या आवळल्या मुसक्या, ६३४ किलो वजनाचा गांजा अमली पदार्थ व इतर मुद्देमाल असा सुमारे तीन कोटी रु. किंमतीचा मुद्देमाल केला जप्त.
बारामती/संपादक-(विकी आगम)
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व बारामती शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत आंतरराष्ट्रीय गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा मोठा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल ६३४ किलो गांजा अमली पदार्थ, दोन इनोव्हा कार व इतर मुद्देमाल असा एकूण ३,०३,१९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. नशामुक्त भारत अभियानांतर्गत पुणे ग्रामीण जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू असून पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. दि. २८ एप्रिल २०२६ रोजी बारामती city पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(c), २०(b)(ii)(c), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान जळोची पिंपळी रोड परिसरात भारत कांबळे यांच्या शेताजवळ दोन प्लास्टिक ड्रममध्ये ४७५ किलो ५५० ग्रॅम गांजा, किंमत २,३२,७४,५०० रुपये, जप्त करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी प्रकाश उर्फ पद्या मोहन काळे, समाधान धर्मराज गायकवाड, प्रिन्सकुमार मन्ना सिंग, राहुल कल्याण गोरे, विकी उर्फ पप्पू कांबळे, संग्राम उर्फ चंदन सिंग व जांकी माही यांचा सहभाग निष्पन्न झाला. आरोपी हे छत्तीसगड राज्यातून गांजा आणून पुणे, सांगली, सातारा व सोलापूर परिसरात विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले. सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तासगाव परिसरात एका इनोव्हा कारमधून १३४ किलो गांजा जप्त करण्यात आला. तसेच बारामतीतील सुभाष फळटण रोड परिसरात दुसऱ्या इनोव्हा वाहनातून २३ किलो गांजा हस्तगत करण्यात आला. कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी व पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे यांनी केली. “अमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन, पोलीस कंट्रोल रूम किंवा पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन बारामती पोलिसांकडून करण्यात आले आहे.”

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

