ताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

कुटुंबासह सहभागी व्हा! विराट हिंदू संमेलनासाठी हिंदू समाजाला हाक


बारामती/संपादक-(विकी आगम)
माळेगाव बु. येथे धर्म, संस्कृती आणि हिंदू संघटन बळकट करण्यासाठी बुधवार दि. ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता राजे अमरसिंह कॉलनी येथे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीची अपेक्षा व्यक्त होत आहे. या संमेलनात हिंदुत्ववादी प्रवक्त्या पूज्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, सनातन युवा योद्धा आशुतोष झा, हिंदुत्ववादी बुलंद आवाज धवलसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हिंदुत्व, राष्ट्रभक्ती, संस्कृती रक्षण आणि संघटन या विषयांवर विचारमंथन होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून १००८ लोकांसह सामूहिक हनुमान चालीसा पठण आयोजित करण्यात आले असून, एकजुटीचा शक्तिप्रदर्शनाचा संदेश यातून दिला जाणार आहे. विशेष म्हणजे लहान मुलांपासून युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच संपूर्ण कुटुंबासह या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हिंदू समाजाच्या व्यापक सहभागातून हे संमेलन जनआंदोलनाचे स्वरूप धारण करणार असून, आयोजकांनी सर्व समाजबांधवांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे. संमेलनाच्या माध्यमातून “एकत्र येऊया, संघटित होऊया, शक्तिशाली बनूया” हा संदेश देत धर्म आणि राष्ट्रासाठी एकजूट निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *