क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

टॉवर लाईन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; सुपा पोलिसांचा धडाका, पाच जण जेरबंद


बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती तालुक्यातील खंडूबेवाडी व शेरेवाडी परिसरातून टॉवर लाईनमधील अॅल्युमिनियम कंडक्टर तार चोरी प्रकरणाचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या. या धडाकेबाज कारवाईत चोरीस गेलेला सुमारे १३ लाख ४१ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप व मोटारसायकल जप्त करण्यात आली. ४ ते ८ मार्चदरम्यान टॉवर लाईनमधील अॅल्युमिनियम तारा चोरीस गेल्याचे उघड झाल्यानंतर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि तपासाच्या जोरावर पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे टॉवर लाईन चोरी करणाऱ्या टोळीचे जाळे उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत शिवशंकर मारुती हळदेकर, मोहनसिंग धनसिंग राजपूत, सूरज राजू गिरसे उर्फ सूरज डोंगरे, कलाम अब्दुल हमीद खान आणि अर्जुन श्रीराम यादव या पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले. आरोपींकडून चोरीतील मालासह गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करून पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवरसे, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस हवालदार संतोष पवार, महेंद्र गायकवाड, रुपेश साळुंखे, पोलीस अंमलदार किसन ताडे, महादेव साळुंखे, भाऊसाहेब चौधरी व चालक सीमनाथ होले यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली. सुपा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे टॉवर चोरी टोळीचा पर्दाफाश झाला असून परिसरातील गुन्हेगारीला मोठा चाप बसला आहे. या कामगिरीमुळे सुपा पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

 


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *