क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रसामाजिक

सेक्स रॅकेट”ची धमकी देत उकळवणी; तीन पोलीस निलंबित


बारामती/संपादक-( विकी आगम)

वाघोली पोलीस ठाणे येथील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना उकळवणीच्या गंभीर प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी रात्री आवाजाच्या तक्रारीवरून पोलीस घटनास्थळी गेले. त्यानंतर एका संगणक अभियंता तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे संबंधित पोलिसांनी खोट्या “सेक्स रॅकेट” प्रकरणात अडकवण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे मागितले. दबावाखाली त्या तरुणाकडून ऑनलाइन (UPI) माध्यमातून सुमारे १० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.  या घटनेनंतर पीडितांनी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत चौकशी करण्यात आली असता प्राथमिक तपासात आरोपांना पुष्टी मिळाली, त्यानंतर संबंधित तिन्ही कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली.  या प्रकरणात पुढील विभागीय चौकशी सुरू असून, दोषी आढळल्यास अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *