क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

अपहरण, अत्याचार आणि गोमांस खायला भाग पाडलं – भिगवण प्रकरणाने संताप उसळला


बारामती/संपादक-(विकी आगम)

भिगवण येथील अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात पीडितेने दिलेल्या जबाबातून धक्कादायक आणि गंभीर आरोप समोर आले आहेत. आरोपींनी धमक्या देत, मानसिक दबाव टाकत आणि भीती निर्माण करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिला विविध ठिकाणी हलवत बारामती येथे एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. त्या काळात तिच्यावर अत्याचार करण्यात आले तसेच त्याचे फोटो काढून नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत तिला गप्प बसण्यास भाग पाडण्यात आले. तसेच, जबरदस्तीने “आम्ही स्वेच्छेने लग्न केले” असे सांगणारा व्हिडिओ तयार करून घेण्यात आला. स्टॅम्प पेपरवर धाकदपटशा करून सह्या घेतल्याचा आरोपही तिने केला आहे. कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे ती सतत भीतीखाली असल्याचेही तिने नमूद केले आहे. पीडितेने पुढे सांगितले की, आरोपींच्या दबावामुळे तिने सुरुवातीला पोलिसांसमोर त्यांच्या म्हणण्यानुसार जबाब दिला होता. मात्र सुरक्षित वातावरण मिळाल्यानंतर तिने संपूर्ण घटनाक्रम उघड केला. ४ एप्रिल रोजी दिलेल्या सविस्तर जबाबात पीडितेने लैंगिक अत्याचार, मानसिक व शारीरिक छळ, अपहरण, धमक्या, जबरदस्तीने व्हिडिओ देणे, धाकदपटशाने सह्या घेणे यासह तिची टिकली काढण्यास भाग पाडणे तसेच गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात झहीर हरुण शेख, आयान हरुण शेख, अझर शौकत शेख (रा. स्वामी चिंचोली, ता. दौंड) आणि सद्दाम शेख (रा. बारामती) यांच्यावर गुन्हा रजि. नं. ३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *