क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

गॅस KYC अपडेटच्या नावाने बँक खाते साफ; पुण्यात सायबर फसवणुकीचा नवा प्रकार उघड


बारामती/उपसंपादक-(विवेक साळूंके)
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवत नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा नवा प्रकार समोर आला आहे. “गॅस KYC अपडेट करा”, “सबसिडी बंद होईल” किंवा “कनेक्शन रद्द होणार” अशा संदेशांद्वारे सायबर गुन्हेगार नागरिकांना बनावट लिंक पाठवून त्यांच्या बँक खात्यांवर डल्ला मारत आहेत. पुणे शहरात अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून अनेक नागरिकांना लाखोंचा आर्थिक फटका बसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करताच बनावट वेबसाइट किंवा अ‍ॅप उघडते आणि ग्राहकांकडून बँकिंग माहिती, डेबिट/क्रेडिट कार्ड तपशील, ओटीपी आणि पिन मागवला जातो. ही माहिती मिळताच काही मिनिटांतच खात्यातील पैसे गायब होत आहेत.सायबर फसवणुकीची पद्धत कशी चालते? सायबर गुन्हेगार नागरिकांना घाबरवण्यासाठी “KYC अपडेट नाही तर गॅस बंद”, “सबसिडी मिळणार नाही” अशा धमकीवजा मेसेज पाठवतात. या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर बनावट वेबसाईट उघडते. काही प्रकरणांमध्ये ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे भासवून फोन कॉलद्वारेही माहिती घेतली जाते. लिंकवर क्लिक = खाते रिकामे फसव्या लिंकवर क्लिक केल्यास मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल होण्याचा धोका असतो. यामुळे मोबाईलमधील संवेदनशील माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते. त्यानंतर ओटीपी मिळताच काही मिनिटांतच खात्यातील रक्कम काढली जाते.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

  • अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
  • ओटीपी, पिन, पासवर्ड कोणालाही सांगू नका
  • फक्त अधिकृत अ‍ॅप आणि वेबसाईटच वापरा
  • संशयास्पद कॉल्स व मेसेजेस टाळा
  • अधिकृत कस्टमर केअर नंबरच वापरा

फसवणूक झाल्यास काय करावे? सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाईनवर संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. जवळच्या पोलिस ठाण्यातही माहिती देणे आवश्यक आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *