ताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

बारामतीत ‘स्पीड ब्रेकर’ मोहीम सुरू नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पाऊल


बारामती/संपादक -(विकी आगम)

बारामती शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बारामती नगर परिषदेकडून महत्त्वाचा निर्णय अमलात आणण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील मुख्य रस्त्यांवर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याचे काम आज दिनांक २३ मार्च २०२६ रोजी प्रत्यक्षात सुरू करण्यात आले. या संदर्भात २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नगरपालिकेला पत्र देण्यात आले होते. त्या मागणीची दखल घेत प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करत कामाला सुरुवात केली आहे. विशेषतः सातव शाळा परिसर आणि श्री राम चौक, तसेच वाहतूक जास्त असलेल्या भागांमध्ये अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हे गतिरोधक बसविण्यात येत आहेत. दोन महिन्यांपूर्वी बारामतीत झालेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेदरम्यान हे गतिरोधक काढण्यात आले होते. त्यानंतर अपघातांचे प्रमाण वाढल्याची नागरिकांकडून तक्रार येत होती. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सचिनशेठ सातव यांच्या सहकार्याने हे काम मार्गी लागले. यावेळी नगरसेविका शर्मिला शिवाजीराव ढवाण पाटील , नगरसेवक गणेश काका जोजारे,माजी नगरसेवक सुरज सातव ,नगरसेवक अल्ताफ सय्यद, तसेच प्रतिक ढवाण पाटील , केशव चांदगुडे, प्रतिक जगताप, किशोर उबाळे, विलासकाका मोरे, काटे साहेब आणि ठेकेदार अशोक पवार उपस्थित होते. नागरिकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने उचललेले हे पाऊल सुरक्षित व सुव्यवस्थित वाहतुकीकडे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *