महिला आयोगाला मोठा धक्का; रुपाली चाकणकरांचा राजीनामा
बारामती/संपादक-(विकी आगम)
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी वैयक्तिक कारणांचा दाखला देत हा राजीनामा स्वेच्छेने सादर केला असल्याचे अधिकृत पत्रातून स्पष्ट केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही काळापासून वैयक्तिक कारणांमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. आपल्या कार्यकाळात महिला सक्षमीकरण, अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देणे आणि विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.दरम्यान, त्यांच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, पुढील अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. शासन स्तरावर त्यांचा राजीनामा विचाराधीन असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, हा राजीनामा केवळ वैयक्तिक कारणांपुरता मर्यादित आहे की यामागे अन्य काही कारणे आहेत, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




