सावता महाराजांच्या अरण तीर्थक्षेत्रासाठी ८९.०८ कोटींची मान्यता
बारामती/संपादक-(विकी आगम)
संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या अरणच्या विकासाचा श्रीगणेशा लवकरच होणार असून, एकूण मंजूर १५० कोटी रुपयांच्या आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील ८९.०८
कोटी रुपयांच्या विकासकामांना १६ मार्च रोजी शासन आदेशान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.वारकरी संप्रदायाची पहिली संजीवन समाधी असलेले आणि संत साहित्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे कर्मयोगी संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी असलेले अरण तीर्थक्षेत्र अनेक वर्षे दुर्लक्षित होते. मात्र आता या विकास आराखड्यामुळे तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होणार असून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.या विकासामुळे वारकरी भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अरण विकासाची दीर्घकाळापासून असलेली मागणी आता प्रत्यक्षात उतरणार असल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, अरण विकासासाठी दिलेला शब्द पूर्ण करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, तसेच अतुल सावे, छगन भुजबळ, योगेश टिळेकर यांसह विविध मान्यवर आणि स्थानिक सेवेकरी, वारकरी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि भक्त परिवार यांच्या वतीने शासनाचे तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )





