ताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

बारामतीच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या अजित दादा यांना श्रद्धांजली; हिंदू नववर्षाची शोभायात्रा रद्द


बारामती/प्रतिनिधी-(प्रशांत बनकर)

बारामतीच्या विकासात मोठे योगदान देणारे अजित दादा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात येणारी शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. ही माहिती सकल हिंदू समाज व हिंदुराष्ट्र सेना बारामती यांच्या वतीने देण्यात आली.बारामतीच्या जडणघडणीत आणि विकासात अजित दादा यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आयोजित केली जाणारी ही शोभायात्रा यंदा रद्द करण्यात आली असली तरी, पुढील वर्षी हिंदू नववर्षाची शोभायात्रा अधिक मोठ्या प्रमाणात व भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.शहरातील  हिंदू समाजाने या निर्णयाची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन हिंदुराष्ट्र सेना बारामती यांच्या वतीने करण्यात आले आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *