आता महिन्याला एकच गॅस सिलिंडर; बुकिंगसाठी २५ दिवसांची अट
बारामती/संपादक-(विकी आगम)
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने केंद्र सरकारच्या सूचनेनंतर गॅस वितरक कंपन्यांनी नवीन नियम लागू केले आहेत. या निर्णयानुसार आता घरगुती ग्राहकांना महिन्यातून फक्त एकच गॅस सिलिंडर मिळणार आहे.यापूर्वी गॅस सिलिंडरचे ऑनलाइन बुकिंग १५ दिवसांनी करता येत होते. मात्र नवीन नियमानुसार हा कालावधी वाढवून २५ दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना पुढील सिलिंडरसाठी किमान २५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.बुकिंग केल्यानंतरही सिलिंडरची डिलिव्हरी मिळण्यासाठी साधारण २ ते ४ दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे प्रत्यक्षात एका ग्राहकाला महिन्यातून एकदाच गॅस सिलिंडर मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता हा नियम लागू झाल्याने अनेक ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




