गॅस पुरवठ्यात अडचणी हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंता
बारामती/संपादक (विकी आगम)
देशभरात एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होत असल्याने हॉटेल व्यवसायासह घरगुती ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक भागांत व्यावसायिक १९ किलो गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या असून त्यामुळे हॉटेल रेस्टॉरंट ढाबे आणि केटरिंग व्यवसायावर थेट परिणाम होत आहे हॉटेल व्यवसाय पूर्णपणे व्यावसायिक गॅस सिलेंडरवर अवलंबून असल्याने सिलेंडर मिळण्यात उशीर झाल्यास स्वयंपाकाचे कामकाज ठप्प होण्याची वेळ येते काही हॉटेल चालकांना गॅस मिळत नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे
परिणामी हॉटेलमधील जेवणाचे दर वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे गॅस पुरवठा कमी होण्यामागे वितरण व्यवस्थेतील अडचणी मागणी वाढणे आणि काही ठिकाणी घरगुती ग्राहकांना प्राधान्य दिले जात असल्याचे कारण समोर आले आहे त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा उशिरा होत असल्याची चर्चा सुरू आहे या परिस्थितीचा परिणाम घरगुती ग्राहकांवरही झाला आहे अनेक नागरिकांनी गॅस बुकिंगनंतर सिलेंडर मिळण्यास उशीर होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत ज्यामुळे स्वयंपाकघरातील खर्च आणि त्रास दोन्ही वाढण्याची शक्यता आहे हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासन आणि गॅस कंपन्यांकडे तातडीने पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे अन्यथा येत्या काही दिवसांत हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जागतिक परिस्थितीमुळे गॅस संकट इराण इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे भारत मोठ्या प्रमाणावर एलपीजी आयात करतो आणि ८५–९०% गॅस मध्यपूर्व देशांमधून येतो त्यामुळे जागतिक तणाव थेट भारतातील गॅस उपलब्धतेवर परिणाम करत आहे

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )





