क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

बारामतीत घरामध्ये गाईंची कत्तल करून मांस विक्री जगताप मळा परिसरात संताप


बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती शहरातील जगताप मळा परिसरात, फातिमा माजिद समोर असलेल्या एका घरामध्ये गाईंची कत्तल केली जात असल्याचा संशय व्यक्त होत असून घराच्या बाहेर गो मांस विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे राज्यात गोवंश कत्तलीवर कायदेशीर निर्बंध असताना असा प्रकार घडत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीमध्ये पाण्याचे जार वाहतूक करणाऱ्या एका गाडीमार्फत गोमांसाची वाहतूक करून त्याची विक्री केली जात असल्याची बाबही समोर आली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.या प्रकरणाची गंभीर दखल घेत माननीय पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली. विशेष म्हणजे संबंधित मांस विक्रेत्यावर यापूर्वीही पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून तपासाअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेमुळे जगताप मळा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *