ताज्या घडामोडीदेश-विदेशमहत्त्वाचेराजकीयशहरसामाजिक

उद्या मुंबईत सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार ?


 बारामती/संपादक ( विकी आगम ) 

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड निश्चित झाली असून, सुनेत्रा अजित पवार या उद्या मुंबईत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे अधिकृतरीत्या निश्चित झाले आहे. सत्ताधारी आघाडीतील चर्चेनंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

राज्याच्या नेतृत्व पातळीवरील या बदलामुळे नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे. सरकारच्या कामकाजात अधिक वेग आणि समन्वय साधण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

शपथविधी समारंभ मुंबईतील राजभवन येथे पार पडण्याची शक्यता असून, कार्यक्रमाची अधिकृत वेळ लवकरच जाहीर केली जाणार आहे. या शपथविधीकडे राज्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सुनेत्रा अजित पवार यांच्या या नव्या जबाबदारीमुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात एकच खळबळ सुरू आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण होऊन नवा अध्याय लिहिला जाणार का? शरद पवार NDA सोबत जाणार का? दादांकडे असणारी महत्त्वाची खाती सुनेत्रा अजित पवार यांना मिळणार का पक्षातील बड्या लोकांच्या नजरा मलाईदार खात्यांवर असणार?


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *