बारामतीत अतिक्रमण कारवाईवर प्रश्नचिन्ह; लहान विक्रेत्यांवरच नियमांचा बडगा का? मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई कधी? नागरिकांचा प्रशासनाला सवाल
बारामती/संपादक-(विकी आगम )
बारामती शहरातील अतिक्रमण हटाव कारवाईच्या पद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहरातील मोठमोठी अतिक्रमणे, फुटपाथवरील बांधकामे आणि विविध भागांतील लेखी तक्रारी प्रलंबित असताना एका हातगाडा व्यावसायिक महिलेवर झालेल्या कारवाईमुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरात अनेक ठिकाणी रस्ते व फुटपाथ अडवून अतिक्रमणे झालेली असल्याच्या तक्रारी वेळोवेळी करण्यात आल्या आहेत. मात्र अशा प्रकरणांवर अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दुसरीकडे, अंडा भुर्जी गाडा चालवणाऱ्या एका महिला व्यावसायिकावर झालेल्या कारवाईमुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे.” “कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. शहरातील अवैध दारूविक्री, मटका, ऑनलाइन जुगार, अमली पदार्थांचे व्यवहार, फरार आरोपी आणि मोठ्या प्रमाणावरील अतिक्रमणे यांच्याविरोधात प्रभावी कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, अतिक्रमण करणे चुकीचेच आहे आणि त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र ही कारवाई कोणताही भेदभाव न करता सर्वांवर समानपणे झाली पाहिजे. कायद्याचा वापर निवडक व्यक्तींवर नव्हे तर सर्वांसाठी समान निकषांवर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 19(1)(अ) नुसार प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्याच अधिकाराचा वापर करून नागरिक प्रशासनाला जाब विचारत असून कायद्याच्या चौकटीत राहून आपली भूमिका मांडत आहेत. शहरातील अनेक नागरिकांनी प्रशासनाने केवळ लहान व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी मोठ्या अतिक्रमणांवर आणि अवैध धंद्यांवरही तितक्याच कठोरपणे कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
जनतेचा सवाल
“बारामती अवैध धंदेमुक्त आणि अतिक्रमणमुक्त कधी होणार

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




