महत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

गरज चौकात, बंदोबस्त रिंग रोडवर; ट्रॅफिक पोलिसांवर प्रश्नचिन्ह


बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती शहरातील कारभारी सर्कलसह प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दररोजच्या कोंडीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे. कारभारी सर्कल, गांधी चौक, भिगवण चौक, अहिल्यादेवी होळकर चौक आणि गुणवडी चौक येथे मिनिटा-मिनिटाला वाहतूक ठप्प होत असल्याचे वास्तव आहे. मात्र या ठिकाणी आवश्यक तेवढे ट्रॅफिक नियंत्रण दिसत नाही. जिथे खऱ्या अर्थाने गरज आहे त्या शहरातील चौकांमध्ये ट्रॅफिक पोलिसांची उपस्थिती कमी भासत असताना, रिंग रोडवरच अधिक बंदोबस्त दिसत असल्याने नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातील दुकानांसमोरच वाहने उभी केली जात असतानाही अनेक ठिकाणी त्यावर तात्काळ कारवाई होत नसल्याचे दिसते. परिणामी, कोंडी वाढत असतानाही ती थांबवण्यासाठी प्रभावी हालचाल होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. “गरज असलेल्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नाहीत, आणि जिथे कमी गरज आहे तिथेच कारवाई”—अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. श्री गणेश मार्केट मंडई परिसरात पार्किंगची सुविधा असतानाही रस्त्यावरच वाहन उभी केली जात असल्याने वाहतुकीचा ताण अधिक वाढत आहे. यामुळे शहरातील ट्रॅफिक समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे. एकूणच, बारामती शहरातील वाहतूक व्यवस्थेतील विस्कळीतपणा आणि ट्रॅफिक पोलिसांचे अपुरे नियोजन हे स्पष्टपणे समोर येत आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *