ताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

बारामतीत धर्मवीर बलिदान मास; तरुणांचा वाढता सहभाग


    बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती शहरात धर्मरक्षणासाठी प्राणार्पण करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ “धर्मवीर बलिदान मास” विविध उपक्रमांनी भावपूर्ण वातावरणात पाळला जात आहे. शहरातील तरुण, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून, बारामती शहरात वेगवेगळ्या ५० ठिकाणी दररोज सायंकाळी प्रतिमे चे पूजन, संभाजीसूर्यहृदय श्लोक, प्रेरणा मंत्र, ध्येयमंत्र यांचे वाचन केले जाते.या उपक्रमामागील प्रेरणा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची असल्याचे आयोजकांनी सांगितले.श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी धर्मकार्यासाठी अहोरात्र कार्यरत असून समाजजागृतीचे कार्य निष्ठेने पार पाडत आहेत..सुमारे चार दशकांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आज महाराष्ट्रभर पोहोचला असून तरुण पिढीपर्यंत संभाजी महाराजांच्या बलिदानाची जाणीव करून देण्याचे, कृतदन्य होण्याचे मुख्य कार्य आहे.बलिदान मासादरम्यान सहभागी तरुण साधेपणा पाळत असल्याचे दिसून येत आहे. अनेकजण मुंडण करणे, मांसाहार सोडणे,एकवेळ जेवण करणे, अनवाणी राहणे, गोड-धोड व मनोरंजन टाळणे, वाढदिवस साजरे न करणे अशा पद्धतीने धर्मवीरांच्या बलिदानाचे स्मरण करत आहेत, तसेच समाजात हिंदू एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

इतिहासातील अत्यंत कठीण प्रसंगांना सामोरे जात स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेल्या बलिदानामुळे संभाजी महाराज आजही प्रेरणास्थान आहेत. धर्मवीर बलिदान मासाच्या निमित्ताने त्यांच्या शौर्यगाथेची आठवण करून देत समाजात राष्ट्रभक्ती आणि संस्कार जागवण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.बारामतीत सुरू असलेल्या या उपक्रमामुळे तरुणांमध्ये इतिहासाविषयी अभिमान निर्माण होत असून पुढील पिढीपर्यंत स्वराज्याचा वारसा पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडत असल्याचे मत व्यक्त होत आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *